रिलायन्सच्या प्रवासातून काय शिकावे?

धीरूभाई अंबानी यांनी १९५७ मध्ये ५०० स्क्वेअर फुटाच्या ऑफिसमधून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यावेळी ते यार्न ट्रेडिंगचा बिझनेस करत. पुढे जाऊन आपली कंपनी भारतातील सर्वात मोठी कंपनी बनली पाहिजे अशी त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यांनी ते करूनही दाखवले.

 

रिलायन्सचा प्रवास तर सगळ्यांनाच माहित आहे. २०१९ मध्ये रिलायन्स १० लाख कोटींचे मार्केट कॅपिटल असणारी पहिली भारतीय कंपनी बनली. त्याच्या पुढच्या वर्षी २०२० मध्ये जगातील सर्वाधिक व्हॅल्यूड कंपन्यांच्या यादीत रिलायन्स ४८ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली. फॉर्च्युन ग्लोबल ५०० च्या यादीतही रिलायन्स ९६ व्या स्थानी विराजमान झाली.

 

रिलायन्सच्या १९५६ मधील सुरुवातीनंतर २० वर्षांनी १९७७ मध्ये रिलायन्स टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचा आयपीओ आला. तेव्हापासून ते आजतागायत रिलायन्सचा एक कंपनी म्हणून प्रवास निश्चितच प्रेरणादायक आहे. या सगळ्या प्रवासात रिलायन्सने एक गोष्ट प्रकर्षाने केली. ती म्हणजे गरज पडेल तसे व्यवसायात बदल करणे.

 

पॉलिस्टर पासून सुरु झालेला हा व्यवसाय नंतर टेलिकॉमपर्यंत येऊन पोहोचला. २००० च्या दशकांत रिलायन्सचे प्रमुख व्यवसाय कोणते होते हे आठवून पाहिलं तर पॉवर, फायनान्शियल सर्व्हिसेस, आणि टेलिकॉम हे सेक्टर डोळ्यासमोर येतात.

 

याशिवाय रिलायन्सनवे केमिकल्स, ऑइल अँड गॅस, रिटेल, डिजिटल सर्व्हिसेस, मीडिया हे सेक्टर्समध्ये आपल्या व्यवसायाचे डायव्हर्सिफिकेशन केले आहे. या सगळ्यातून आपण काय शिकू शकतो? आज आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे ते सध्या किंवा अगदी पुढच्या ५-७ वर्षांसाठी जरी योग्य वाटले, महत्वाचे वाटले, पैसा मिळवून देणारे वाटले तरी २० वर्षानंतर तशीच परिस्थिती असेल याची अजिबात खात्री नाही.

 

गुंवतणूकीचे असेच आहे. आपलय पोर्टफोलिओमध्ये  एकाच प्रकारच्या कंपन्यांचे स्टॉक्स ठेवण्यापेक्षा डायव्हर्सिफिकेशन करणे कधीही हितकारकच ठरते. इन्व्हेस्टमेंट करताना कंपनी काय करते, त्यांचा व्यवसाय काय आहे? आजूबाजूच्या घटकांना अनुसरून कंपनी मॅनेजमेंट कसे बदल करते?बिझनेस वाढवत नेण्यासाठी त्यांच्या काय योजना आहेत? मिळालेला नफा पुन्हा कंपनीसाठीच वापरला जातोय का? प्रॉडक्शनची क्षमता वाढते आहे का? या सगळ्या घटकांचा विचार करून मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

 

Comments are closed.