३५ कोटी ग्राहक नोव्हेंबर महिन्यात म्हणणार, ‘पेटीएम करो’
Paytm is much more than just a UPI payment app
येत्या दिवाळीत किंवा त्यानंतर लगेचच पेटीएमचा आयपीओ येणार आहे. साधारणपणे २१ हजार कोटी साईझ असलेला भारतीय बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल. त्या पार्श्वभूमीवर पेटीएम आणि त्या कंपनीच्या एकूण सगळ्या पसाऱ्यावर नजर टाकण्याचा हा एक प्रयत्न.
पेटीएमने २०१० मध्ये व्यवसायाची सुरुवात केली ती एक डिजीटल वॉलेट म्हणून. या वॉलेटमध्ये पैसे टाकून लोक मोबाईल रिचार्ज किंवा बिलं भरणे यासारखे व्यवहार करू शकतात. मात्र गेल्या काही वर्षात पेटीएमने स्वतःची ओळख एक पेमेंट इकोसिस्टिम म्हणून निर्माण केली आहे. पेटीएमवरून आता युपीआय पेमेंट, वॉलेट, सेव्हिंग्ज, इंश्युरन्स, वेल्थ मॅनेजमेंट असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पेटीएमशी निगडित आकडेवारी बघुयात.
पेटीएम ऍप इन्स्टॉल केलेले युजर्स – ३५ कोटींहून अधिक
मंथली ऍक्टिव्ह युजर बेस – ५ कोटींहून अधिक
पेटीएमवरील मर्चंट्सची संख्या – २ कोटींहून अधिक
पेटीएम पेमेंट्स बँकेचे एकूण ग्राहक – ६ कोटींहून अधिक
एवढ्या मोठ्या संख्येने युजर्स असताना पेटीएम त्याचा स्वतःसाठी कसा फायदा करून घेतेय?
१. इंश्युरन्स टेक – पेटीएम आपल्या प्लॅटफॉर्मवरून इंश्युरन्स उपलब्ध करून देते. लवकरच पेटीएम आपली स्वतःची जनरल इंश्युरन्स कंपनी स्थापन करणार आहे. त्यासाठी लागणारे अप्रूव्हल्स मिळवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
२. क्रेडिट टेक – पेटीएमने काही एनबीएफसीबरोबर टाय अप केले आहे. याद्वारे युजर्सने पेटीएम प्लॅटफॉर्मवर वापरलेल्या क्रेडिट सुविधेवर त्यांना २-६% इंटरेस्ट कमावता येतो. पेटीएमच्या एकूण रेव्हेन्यूपैकी २०% टक्के रेव्हेन्यू क्रेडिट टेकद्वारे (२०२३ पर्यंत) कमावण्याचा पेटीएमचा मानस आहे.
३. पेटीएम पेमेंट्स बँक – पेटीएमच्या बँकेचे कस्टमर आणि बँकेत होणारे डिपॉझिट यात सतत वाढ होताना दिसते आहे. गेल्या तीन वर्षांत पेटीएम पेमेंट्स बँकेतील अकाउंट्सची संख्या ४ कोटी ५० लाखांहून ६ कोटी ३० लाखांवर गेली आहे. डिपॉझिट्स २०१८ मधील १४०० कोटींहून २०२० मध्ये २९०० कोटींवर गेले आहे. बँकेचा महसूल २०१८ मधील ७०० कोटींहून २०२० मध्ये २२०० कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
कंपनीतील लीडरशिप पोझिशन्सवर योग्य माणसांची नेमणूक –
१. पेटीएमने पेमेंट्स बँकेचा कारभार चालवण्यासाठी सतीश गुप्ता यांना संधी दिली. गुप्ता यांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव ४० वर्षाहून अधिक आहे. तोदेखील एसबीआयचा!
२. ऑनलाईन मर्चंट पेमेंट्स, ऍडव्हर्टायझिंग, डिजीटल गुड्स बिझनेस लीड करण्यासाठी पेटीएमने गुगलच्या प्रवीण शर्मा यांना आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. शर्मा यांना या क्षेत्राचा २२ वर्षाहून अधिक अनुभव आहे.
३. क्रेडिट बिझनेस लीड करण्यासाठी पेटीएमने क्लिक्स कॅपिटल, आयसीआयसीआय बँकेचा १७ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या भावेश गुप्ता यांना संधी दिली आहे.
४. पेटीएम मनी ज्यावर स्टॉक्स, म्युच्युअल फंड या वेल्थ मॅनेजमेंट प्रॉडक्ट्सची होते, त्यासाठी बीएनपी पारिबासमध्ये १७ वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या वरून श्रीधर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
५. पेटीएम इंश्युरन्स लीड करण्यासाठी विनीत अरोरा या १८ वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, एगॉन लाईफमध्ये काम केलेल्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.
पेटीएमचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्या काही सुविधा त्यांच्याकडून पुरवल्या जातात त्या त्यांच्याच इकोसिस्टिमवरून पूर्ण करता येतात. पेटीएम पेमेंट्स बँकेमुळे हे ट्रान्झॅक्शन करणे अतिशय सुकर झाले आहे. साहजिकच पेटीएमवरील ट्रान्झॅक्शन फेल्युअर रेट इतर ऍपच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या ऍपचे डाऊनलोडस आणि रेटिंग चांगले आहेत. या पेमेंट इकोसिस्टिमचा फायदा पेटीएमला आपला क्रेडिट बिझनेस, इंश्युरन्स बिझनेस, वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस वाढवण्यासाठी होणार आहे. प्लेस्टोअर आणि ऍप स्टोअर फोन पे, गुगल पे यांच्या तुलनेत पेटीएमचे डाऊनलोडस जास्त आहेत. रेटिंग या तीनही ऍपचे जवळपास सारखे आहेत.
फास्टॅग – भारतात टोल भरण्यासाठी फास्टॅग सुरु झाल्यापासून या क्षेत्रात पेटीएमने आघाडी घेतली आहे. देशभरातल्या जवळपास २११ टोल प्लाझावरील फास्टॅग ट्रान्झॅक्शन पेटीएमवरून होतात. भारतात वापरात असलेल्या एकूण फास्टॅगपैकी २५-३०% फास्टॅग पेटीएमवरून इश्यू केले गेले आहेत.
पेरोल प्रोसेसिंग – पेटीएमकडून कार्पोरट कंपन्यांना पेरोल प्रोसेसिंग सोल्युशन्सदेखील पुरवले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांचे अलाउन्स डिजिटली मॅनेज करणे कंपन्यांना सहज शक्य होते.
सॅलरी अकाउंट्स – पेटीएम जवळपास २००० कार्पोरेट कंपन्यांना सॅलरी अकाउंट्सची सुविधा पुरवते. साहजिकच या कंपन्या पेटीएमचे पेरोल प्रोसेसिंगसुद्धा वापरतात.
वरवर पाहता साधं एक पेमेंट ऍप वाटणारं पेटीएम प्रत्यक्षात एवढं मोठं काहीतरी असू शकेल याची कल्पनासुद्धा अनेकांना करवणार नाही. मात्र पडद्यामागे पेटीएम हे एक अवाढव्य साम्राज्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाकी आयपीओला रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी किती टक्के वाटा मिळतो इथून सुरुवात होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये गेल्या महिन्यात पेटीएमचा शेअर ११ हजार रुपयांनी विकला जात होता. आता त्याची किमंत २१ हजार झाली आहे असे समजते आणि विशेष म्हणजे कुणीही हा शेअर विकायला तयार नाहीये यावरून आयपीओला किती मागणी असेल याचा अंदाज करता येईल.
Comments are closed.