टाटा की मारुती सुझुकी? कोण कमवतं प्रत्येक गाडीमागे मोठा प्रॉफिट?
Tata is making more money per car than Maruti for the 1st time in a decade
ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे ज्ञान असणाऱ्या प्रत्येकाला वाहनांची किंमत आणि टॉपवर असलेला ब्रॅण्ड याबाबत जाणून घेण्याची प्रगल्भ इच्छा असते. प्रत्येकाला कोणत्या गाडीची कंपनी कसे काम करतेय, किती कमावेतय हे जाणून घ्यावसं वाटतं. त्यातही ब्रॅंड जर मारुती सुझुकी किंवा टाटा मोटर्स असेल तर विषयच नाही. म्हणून आज आपण मारुती सुझुकी किंवा टाटा मोटर्स यांची प्रत्येक कार मागील कमाई तुलनात्मकरित्या पाहूया.
या वर्षात ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये सर्वाधिक नफा हा टाटा मोटर्सने कमावला आहे. टाटा मोटर्सने प्रति वाहन कमाईत मारूती सुझुकीलाही मागे टाकले आहे.
टाटा मोटर्सचा प्रति कार ऑपरेटिंग प्रॉफिट दुसऱ्या तिमाहीत 45,810 वर पोहोचला, जो मारुतीच्या जवळपास दुप्पट आहे. टाटा मोटर्सने मार्केटमध्ये आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकीपेक्षा जास्त नफा कमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टाटा मोटर्सचा पर्सनल व्हेईकलमधील ऑपरेटिंग मार्जिन 5.2% पर्यंत वाढला तर मारूती सूझुकीचा मार्जीन 4.2% इतका घसरला.टाटा मोटर्सचा PV सेक्टरमधील ऑपरेटिंग प्रॉफिट सदर सप्टेंबरच्या तिमाहीत मारुती सुझुकीच्या 45% वाढला.
टाटा मोटर्सच्या PV सेगमेंटमध्ये होणारी ही सततची वाढ EBITDA मार्जिनसाठी सकारात्मक गोष्ट आहे.
उत्पादन आणि पुरवठा साखळीतील योग्य व्यवस्थापन यामुळे टाटा मोटर्सने हा टप्पा गाठला आहे. प्रत्येक गोष्टीचं योग्य नियोजन हे टाटाच्या यशाला कारणीभूत ठरलं. दरम्यान मारुती सुझुकीदेखील त्यांच्या ऑपरेशनल परफॉर्मन्समध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर तिमाहीत टाटा मोटर्सचे व्हॉल्यूम 53% वाढून 84,000 युनिट्सवर पोहोचले. याच काळात मारुतीचे व्हॉल्यूम 1.2% कमी झाले, ज्यामुळे एकूण उत्पादनावर 116,000 युनिट्सने परिणाम झाला.
टाटा मोटर्सचा मार्केट शेअर सप्टेंबर 2021 मध्ये 11.3% झाला, जो 2021 मध्ये 8.2% होता.तर मारुतीचा मार्केट शेअर मात्र घसरला. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सची प्रति वाहन मिळकत 8.8 लाख होती तर मारुती सुझुकीची प्रति वाहन मिळकत 5 लाख इतकी होती.
Comments are closed.