मुहूर्त ट्रेडिंगला २०% मूव्ह दिलेला ‘हा’ स्टॉक १ वर्षात देऊ शकतो मजबूत रिटर्न्स – वाचा सविस्तर
Mirza International can give good returns in near future backed by its improving fundamentals
- चामड्याची पादत्राणे बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी
- १९७९ पासून व्यवसायात
- अनेक आघाडीच्या कंपन्यांना तयार लेदर फुटवेअर पुरवणे आणि भारताबाहेरील मार्केटमध्ये फिनिश्ड लेदर पुरवणे हे कंपनीचे उत्पन्नाचे दोन प्रमुख स्रोत
- कंपनी आपल्या प्रॉडक्टसची निर्यातसुद्धा करते.
- एकूण रेव्हेन्यूपैकी ५८% भारतातून, २८% युकेतून, ७% अमेरिकेतून, आणि बाकीचा उरलेल्या मार्केटमधून येतो.
- प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये रेव्हेन्यूची वाटणी ब्रँडेड फुटवेअर (३३%), नॉन-ब्रँडेड फुटवेअर (४०%), अपॅरल्स अँड ऍक्सेसरीज (२२%) आणि लेदर (५%) अशी आहे.
- रेड टेप ब्रँडची मालकी कंपनीकडे आहे. (RedTape)
- ४२ हुन अधिक वर्षांचा अनुभव
- २९ वर्षे विविध फुटवेअर ब्रॅण्ड्सला आपले प्रॉडक्टस पुरविण्याचा अनुभव
- ६ मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स
- २ इनहाऊस डिझाईन स्टुडिओज
- २ ऍडव्हान्स वेअरहाऊस बंगलोर आणि नोएडामध्ये. या वेअरहाऊसचा एरिया ३०००० आणि ७०००० स्क्वेअर फूट एवढा प्रचंड आहे. या वेअरहाऊसमधून कंपनी ईकॉमर्स चॅनेल्स द्वारा आलेल्या ऑर्डर प्रोसेस करते.
- ३ डिस्ट्रिब्युशन ब्रॅंचेस
- २७६ रेड टेप स्टोअर्स ११९ शहरांमध्ये
- २४६ शॉप इन शॉप
- ११ ऑनलाईन पोर्टल्स
- कंपनी दर वर्षाला जवळपास विविध फुटवेअरच्या साडेसहा कोटी जोड्या बनवते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
- ६ खंडातील २४ देशांत विक्री
- फक्त युकेमध्ये १००० हून अधिक मल्टिब्रँड आउटलेट्समध्ये रेड टेपचे प्रॉडक्ट्स विकले जातात
- ५ एक्सक्लुझिव्ह शोरूम
- ७ ग्लोबल ऑनलाईन पोर्टल्स
- दुबईमधील १२ मल्टिब्रँड आउटलेट्समध्ये रेड टेपचे प्रॉडक्ट्स विकले जातात.
मार्च २०२१ वर्षअखेरीस कंपनीचा सेल्स १०४८ कोटी, प्रॉफिट बिफोर टॅक्स १०.४६ कोटी रुपये एवढा होता. याआधीच्या वर्षात रेव्हेन्यू १२६१ कोटी तर प्रॉफिट बिफोर टॅक्स ६४.३ कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत कंपनीने २०१५ कोटींचा सेल्स केला आहे तर प्रॉफिट बिफोर टॅक्स ४९ कोटींच्या आसपास आहे. २०२० हे आर्थिक वर्ष सोडल्यास कंपनी २०१० पासून सातत्याने डिव्हीडंड देत आहे. मार्च २०१९ अखेरीस कंपनीवर ३५७ कोटी डेट होते जे आता मार्च २०२१ अखेरीस १४० कोटींपर्यंत खाली आलेले आहे. कंपनीच्या कॅश रिझर्व्हचा आकडा दरवर्षी वाढताना दिसतो आहे. मार्च २०१० मध्ये १२६ कोटी ते आता मार्च २०२१ अखेरीस हा आकडा ६१३ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
सप्टेंबर २०२१ अखेरीस ६७.७९% शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत. जून २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत कंपनीमध्ये एफआयआयचा स्टेक ०.०६ पेक्षा जास्त कधी नव्हता. मात्र सप्टेंबर २०२१ अखेरीस हाच स्टेक आता १.६४% वर जाऊन पोहोचला आहे.
कंपनीची स्पर्धा रिलॅक्सो (Relaxo) आणि बाटा (Bata) या फुटवेअर कंपन्या तर पेज इंडस्टीज आणि रूपासारख्या अंडरगारमेंट्स बनवणाऱ्या कंपन्यांशी आहे. या कंपन्यांच्या तुलनेत ८६४ कोटी रुपये ही मिर्झा इंटर्नशनलची मार्केट कॅप फारच कमी आहे. मात्र कंपनी ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर पुढे जात राहिल्यास मार्केट कॅप वाढीसाठी प्रचंड वाव आहे.
येणाऱ्या काळात मिर्झासाठी काय पॉझिटिव्ह ठरू शकेल?
१. फुटवेअर प्रॉडक्शनमध्ये चीनखालोखाल भारताचा नंबर लागतो. मात्र भारतातून इतर देशांत निर्यात त्या तुलनेने कमी आहे. चीन आपल्या देशांत बनणाऱ्या एकूण फुटवेअरपैकी ६५% प्रॉडक्ट्स निर्यात करते. मात्र आता बरेच देश, जागतिक बाजारपेठा चीनला पर्याय म्हणून भारताचा विचार करू लागले आहेत. त्यामुळे कंपनीला आपला एक्स्पोर्ट बिझनेस वाढवण्याची चांगली संधी आहे.
२. कंपनी ई-कॉमर्सवर बराच फोकस देत आहे. खाली दिलेल्या फोटोमधून कंपनी कोणते वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरून आपले प्रॉडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचविते आहे हे लक्षात येईल.
३. या क्षेत्रात आधीच सरकारने १००% एफडीआय साठी परवानगी दिलेली आहे. याशिवाय सरकारकडून इंडियन फुटवेअर, लेदर अँड ऍक्सेसरीज डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत २६०० कोटींचे आर्थिक साहाय्य पुरविण्यात येत आहे.
४. जगभरातील पर कॅपिटा फुटवेअर कंझम्पशनचा विचार केला तर ते सध्या ३ जोड्या इतके आहे. हाच आकडा विकसित देशांमध्ये ६-७ जोड्या इतका आहे. भारतातील ग्राहक हळूहळू हा ट्रेंड फॉलो करू लागले आहेत. त्यामुळे या वाढत्या बाजारपेठेचा कंपनीला फायदा होईल. फक्त फुटवेअर क्षेत्रात येणाऱ्या काळात दोन आकडी सीएजीआरने वाढ होताना दिसेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
५. २०२० आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या एकूण लायबिलिटीज १९० कोटींवरून २०२१ च्या अखेरीस ८६ कोटींपर्यंत खाली आल्या आहेत.
टेक्निकली स्टॉक गेल्या अडीच वर्षांपासून रेंजबाउंड होता. स्टॉकने राऊंडिंग बॉटम पॅटर्न फॉर्म केला होता. मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी स्टॉकने तब्बल २०% मूव्ह दिली. या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा शेअर येणाऱ्या काळात चांगला परतावा देऊ शकतो.अर्थात गुंतवणूक करताना एकदा स्वतः पुरेसा अभ्यास करून मगच निर्णय घ्यावा.
Comments are closed.