बापरे! १९९९ सालच्या सोन्याच्या किंमती ऐकून बसेल धक्का, आताच्या किंमतीत तेव्हा घेऊ शकत होता एवढं तोळा सोनं

बीएसई (BSE) सेंसेक्सने गेल्या २१ वर्षांत सोन्याच्या किंमतीपेक्षाही ५० टक्के अधिक परतावा जास्त दिला आहे. असे असले तरीही सोन्याची खरेदी करु नये असे होत नाही. अक्षय तृतीया येत आहे, तर सोने खरेदीचा नक्कीच विचार केला पाहिजे. संकटाच्या काळात सोने आपल्याला एखाद्या कवचासारखं काम करतं, असं अनेक तज्ञांचं मत आहे.

BSE सेंसेक्स १९९९मध्ये ४ हजार १४१ पॉईंट्सवर होता, जो २०२१ वर्षात बुधवारपर्यंत ४८ हजार ६९० वर आहे. याप्रमाणे सोने १९९९ साली ४ हजार २३४ प्रती तोळा होतं. एक तोळा म्हणजे १० ग्रॅम होय. आता याच सोन्याची प्रती तोळा किंमत शुक्रवारी ४७ हजार ७६० रुपये होती. म्हणजे आताच्या ज्या किंमती आहेत, त्यात तुम्ही १९९९ सालामध्ये जवळपास १० तोळे सोने सहज घेऊ शकत होता किंवा तेव्हा १० तोळे सोने घेतले असते तर आज त्याची किंमत जवळपास ४ लाख ७०हजारांच्या पुढे असती. जर परताव्याचा विचार केला तर सेंसेक्सने सोन्याला कधीच मागे सोडले आहे. तरीही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांचं सोन्यावरील प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही.

कशात करावी गुतंवणूक? सोनं की सेंसेक्स?
जर इतिहास पाहिला तर इक्विटी मार्केटमध्ये दिर्घकाळासाठी केलेल्या गुंतवणूकीवर परतावा जास्त मिळाला आहे. परंतू इक्विटीवर जोखीमही मोठी असते. गेल्या काही वर्षात सोन्यात होणारी गुंतवणूक तुलनेने कमी झाली आहे. कारण स्टॉक्ससारख्या गोष्टीत गुंतवणुक करणे सर्वसामान्यांनी सुरु केले आहे. तसेच गुंतवणूकीचे अनेक पर्याय आजकाल उपलब्ध झाले आहेत. काही तज्ञांच्या मते, इक्विटीमध्ये गुंतवणूकदारांना चांगला पोर्टफोलिओ बनवायला मदत होते. तसेच संकटाच्या काळात इक्विटीमधून गुंतवणूकदार सहज पैसे काढू शकतात.

महागाईच्या काळात सोनं करत एखाद्या सुरक्षा कवचासारखं काम
जेव्हा जेव्हा आर्थिक संकट येतं, तेव्हा सोन्यात गुंतवणूक करणे चांगला पर्याय ठरतो. सोन्याच्या किंमतीती खूप मोठे बदल होत नाहीत. जेव्हा अर्थव्यवस्था तेजीत असते, तेव्हा गुंतवणूकदारांनी सोन्यात खरेदी करणं टाळलं पाहिजे. तेव्हा मात्र त्यांनी इक्विटीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. कारण अशावेळी स्टॉकमध्ये चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते.

विषय पैशांचाच आहे तर हेही वाचा- 

-तुमचे अमेरिकेतील नातेवाईक-मित्रही आता गुगल पे ॲपवरुनही करु शकतात तुम्हाला पैसे ट्रान्सफर, कसं ते घ्या जाणून

तुमचे अमेरिकेतील नातेवाईक-मित्रही आता गुगल पे ॲपवरुनही करु शकतात तुम्हाला पैसे ट्रान्सफर, कसं ते घ्या जाणून

 

 

Comments are closed.